हृदयांतर ब्लॉग.कॉम आयोजित "पावसाळी कविता" स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कवितांमध्ये निवड झालेल्या कवींचे मनःपूर्वक अभिनंदन...! या कवितांमधून ३ क्रमांक विजेते म्हणून काढले जातील. बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केले जाईल. लवकरच पुढील माहिती देण्यात येईल.
पावसाळी कविता स्पर्धेच्या उत्कृष्ट कविता
१. पावसाळा
नितळ निरभ्र आकाशी
काळे ढग गर्दी करी
दाटे काळोख भवताली
गडगडाट मन हे दडपी
कधी रीपरीप कधी मुसळधार
कधी सरळसोट कधी तिरपी धार
सर येता कोणी होई स्वच्छंद
कोणी शोधे छप्पर तरी होई चिंब
शाळेतील डब्याची मधली सुट्टी
डबक्यात उड्या मारुन पावसाशी करु पाहे गट्टी,
तारुण्याचा बहर, सहलींचा कहर
हुंदडे मन चहूकडे, फिरण्याची येई लहर
बळीराजा पेरणीत दंग
माळरान होऊ पाहे हिरवेकंच
धरणीमाता भीजे अमृतधारी
हिरवा शालू लेऊ लागली
चार माही, चारी दिशा
मातीचा सुगंध, सणांची भाषा
वर्षाकाठी येई पावसाळा
परी दरवेळी भासे नवा, भासे नवा......
- नेहा सागवेकर , पदवीधर (वाणिज्य शाखा) , ३०३, साई प्रभू अपार्टमेंट, कानसाई सेक्शन, प्लॉट नं. ८५, टेलिफोन एक्स्चेंज जवळ , अंबरनाथ (पूर्व), वय ४१
____________________xxx_________________
२. !! "मेघमल्हाराचा साज" !!
ढगामधल्या सरींना मातीची भूल,
हिरवाईने पाघरली थेंबांची झूल -(१)
चिखलावर वाजतोय धारांचा ताशा,
डराँव डराँव अोरडतोय बेडकांचा तमाशा --(२)
कोसळत्या धारांआड उन्हाची पखरण,
पावसाच्या भाषेच कळतच नाही व्याकरण ----(३)
सभोवताली धारांचा पडदा झिम्म,
नीरव शांततेचा आवाज सुम्म ---(४)
थंडगार झुळूकांना सरींची फूस,
निवत चालली धरणीची कूस __(५)
डबक्यावर पागोळ्यांची झिम्माड कडकड,
धरणीच्या ह्रृदयाची वाढवते धडधड ---(६)
मध्येच कोसळतात सरींसवे गारा,
जमिनीला खिजवायला आकाशाचा मारा ---(७)
पावसाच्या नीरवतेचा वेगळाच असतो आवाज,
सप्तसुरांच्याही पल्याड जातो मेघमल्हाराचा साज ---(८)
म्हणूण म्हणतो पाऊस म्हणजे देवाजीच गाण,
शक्य तितक लुटून घ्या हे कोसळणार सोनं ----(९)
- अजय चव्हाण, २ कस्तुरकुंज, शारदा काँलनी, पिंपळे निलख, पुणे ४११०२७ , संपर्क : ९८८१६१४७४०
____________________xxx_________________
.३. आला पहिला पाउस.
आला पहिला पाऊस,माझी आठवण काढ.
____________________xxx_________________
.३. आला पहिला पाउस.
तुझे जग ,माझे जग जरी अल्याड पल्याड.
कधी आपणही केले ,होते प्रेम जिवापाड ।।आला..
हात हातात गुंफले,ओठ ओठांत रंगले.
सोडु सोडू म्हणताना होती वाढली गं ओढ. ॥ आला.
बघू नको,नको बोलू, तुला हवे तसे जग.
जीव लावला ,लावीन त्याच्या येऊ नको आड.॥ आला..
काल दिसलीस तु गं,होत्या पाणावल्या कडा.
माझे सर्व सुखं तुला ,तुझे दुःख मला धाड. ।। आला..
- प्रसाद भावे, ठाणे, संपर्क : ९८६९१०३२५०
____________________xxx_________________
४. शिर्षक-शापित विळखा
हे पावसा असा काय झाला रे अमुचा गुन्हा।
नाही कसा सुटत तुला अमृताचा पान्हा।
बघ ना रे माझा शेतकरी राजा आहे रे व्याकुळ तहाना।
उपाशीच झोपत आहे त्याचा कान्हा।
हंबरत आहेत गाई गुरे राना वना।
नाही कसा सुटत तुला अमृताचा पान्हा।।
हे पावसा धरती माय अन् तू बाप ना रे।
बापाचे कर्तव्य तू असा कसा विसरलास।
आपुल्याच मुलाना अनाथ करूनी तू कोठे गायब झालास।
तुझेच चक्र तू विसरलास।
अन् तूझ्याच पूञाला दृष्टचक्रात अडकवून गेलास।।
कर्ज सावकार,कर्ज सावकार हाच त्याचा शापित विळखा।
नको रे असा अंत पाहूस हे पावसा।।।
नाही आता आळवणार कुणी राग मल्हार।
न्यायासाठी खटला तुझ्यावरी टाकणार।
जोपर्यंत तु नाहीच बरसणार।
धरतीमातेच्या न्यायासाठी तुला यावेच लागणार।
तुला यावेच लागणार।।।।।।।।
- सौ.रेश्मा रविंद्र मेहता, १०१/ए/३ सुमंगल टाॅवर, तिर्थधाम काॅम्प्लेक्स, सुभाषनगर समोर, लालचौकी, कल्याण (पश्चिम)
____________________xxx_________________
५. पहिल्या पावसाची भेट
पावसाची आणि त्याची,
जरा वेगळीच मैत्री होती...
जुन्या त्या कप्यात,
आठवणीतली ओली छत्री होती...!!!
पावसाच्या संतत धारांशी त्याची,
ओळख फार जुनी होती...
ती समोरुन येऊन धडकन्यात पण,
बहुदा त्याचीच काहीतरी खेळी होती...!!!
भेट ती पहिल्या पावसातली,
जन्मभर पुरणारी होती...
कारण दोघांच्याही हृदयातली धड़धड़,
सारखीच वाढली होती...!!!
तिने भेट म्हणून दिलेली छत्री,
त्याला रे अगदीच प्रिय वाटत होती...
ती नसतांनाही तीच त्याची,
सखी-सोबती बनून मिरवत होती...!!!
त्याच छत्री खाली दोघांची,
अवखळ नजर भिडली होती...
तिच्या हातात हात घालून फिरतांना,
हुरहुर मनात वाढली होती...!!!
एकाच छत्रित फिरणा-या दोघांना,
आयुष्यभराची सोबत मिळणार होती...
पावसानेच नकळतपणे,
ही जोड़ी जमवून आणली होती...!!!
कारण पावसाची आणि त्याची,
जरा वेगळीच मैत्री होती..........!!!!!
- दिपाली पवार, जे. एम. पटेल कॉलेज, द्वितीय वर्ष वाणिज्य शाखा, गोरेगाव (प.)
____________________xxx_________________
६. वाट पाहते वसुंधरा,
कधी बरसतील अमृत जलधारा !
ऋतु मागुनी ऋतु जाता
कधी बरसेल ऋतु वर्षा !
अवतरता पहिली जलधारा,
गंध भिजल्या मातीचा
दरवळण्या आसमंती...
वाट पाहते वसुंधरा, कधी बरसतील अमृत जलधारा !
बरसता जलधारा, तिज मिळे लेण्या शालू हिरव्या विविध छटांचा...
वाट पाहते वसुंधरा, कधी बरसतील अमृत जलधारा !
ओढता पदर हिरव्या शालूचा,
आच्छादण्या उघडी पर्वत स्तनमंडले...
वाट पाहते वसुंधरा, कधी बरसतील अमृत जलधारा !
कोसळता शीतल जीवनधारा, प्राशुनी जलामृत करण्या प्राप्त अमरत्व...
वाट पाहते वसुंधरा, कधी बरसतील अमृत जलधारा !
वर्षता वर्षा, पर्वत स्तनमंडलांतून जलदुग्धधारांचा फुटण्या पान्हा...
वाट पाहते वसुंधरा, कधी बरसतील अमृत जलधारा !
रिमझिम बरसता जलधारा,
पाजूनी जलामृत जन्मण्या
अंकुर भूगर्भातून...
वाट पाहते वसुंधरा, कधी बरसतील अमृत जलधारा !
होता पर्जन्योत्सव,
करण्या संगोपन वृक्षवल्लींचे अन् सजीवांचे...
वाट पाहते वसुंधरा, कधी
बरसतील अमृत जलधारा !
चला वसुंधरेचे वाट पाहणे उतरवण्या प्रत्यक्षात,
राखू संतूलन निसर्गाचे, कारण...
वाट पहात आहे वसुंधरा, कधी बरसतील अमृत जलधारा !
- सुहास भाऊ वाईरकर, वय-55 वर्षे, शिक्षण-बी.काॅम. , 2/34, सी.जी.एस्. काॅलीनी, सेक्टर-7, अँटाॅप हिल, मुंबई-400 037
____________________xxx_________________
७. पाऊस झेलताना......!!
पाऊस झेलताना
राधेचा स्वर झालो
पाऊस खेळताना
मी खट्याळ पोर झालो
ह्या पागोळ्या मला
कितीदा खुणावती
भुललो मी न काही,मी धुंद मोर झालो
झाडे उभी अशी ही
बिलगून एकमेका
ते श्वास शोधताना,जळता निखार झालो
पाखरांचे कंठ ओले
गाणे कसे फुलावे?
ते गीत सांधताना,वेडा फकीर झालो
झिम-झिम्माड ह्या धारा
कितीदा पिऊन घ्याव्या
मन अजुनी अधासी,चांदण चकोर झालो
आभास हे कुणाचे
रोम रोमी भिनले
ये इश्क तो जहर है,मी जां निसार झालो
- सुनिल पाटील(मडिलगेकर), शिक्षण:बी.ए.डी.एड, "शब्दांगण" मडिलगे बुद्रूक , ता.भुदरगड जि.कोल्हापूर-416209 , संवाद-78 75 79 5253 , sunilpatil9008@gmail.com
____________________xxx_________________
८. पाऊल खुणा
____________________xxx_________________
८. पाऊल खुणा
आभाळ ढगांनी भरले कि
पावसाची चाहुल लागते
अंधारलेल्या काळोखात
अचानक विज चमकते
डोळ्यात साठलेलि आशा
पावसा भोवती रिंगन घालते
ताल धरलेल्या थेंबामध्ये
स्वप्न भिजू लागते
झाडे वेली पक्षी ह्यांना
थेंबाची लागते गोडी
साचलेल्या पाण्यावर
कागदाची डुलते होडी
पाऊल खुना मागे ठेवुन
अचानक पाऊस निघुन जातो
काळ्या मातीच्या या गर्भात
अंकुर सुखाचा फुलुन येतो
- प्रतिभा सदाशिव थीगळे, माजलगाव, फोन न. ९४२१६२६७३४
____________________xxx_________________
९. !! खट्याळ पावसाळा !!
कधी होते गंमत , कधी करे तो घोटाळा !
आला पावसाळा , दादा आला पावसाळा !!
कुणी करत मजा, तर कुणाला होई सजा !
पहिल्या वहिल्या,पावसात चिंब चिंब भिजा !!
गुढगाभर पाण्यात, आम्ही 'बुडवितो' शाळा !
आला पावसाळा , दादा आला पावसाळा !!
भाजलेलं कणीस, आणी गरमागरम भजी !
आल घालून, कडक चहा बनवते आजी !!
फुटबाल खेळून झाल, आता चिखलामध्ये लोळा !
आला पावसाळा , दादा आला पावसाळा !!
झिम्मड झिम्मड, पावसावर सुचतील ओळी !
मैत्रिणीच्या छत्रीची, तर गंमत नराळी !!
तिच्या सोबत जाण्यासाठी, छत्री नेण टाळा !
आला पावसाळा , दादा आला पावसाळा !!
विजा पाहू, ऐकू हा ढगांचा गडगडाट !
अंगावर झेलू , अवखळ समुद्राची लाट !!
नभांगणी फुले , इंद्रधनुष्याचा मळा !
आला पावसाळा , दादा आला पावसाळा !!
लोकल मधल्या गर्दीतही, घुसतो पाऊस !
कधी गाडी बंद , कधी होते धूसफूस !!
ऑफिसमध्ये जाण्याचाही, येतो मग कंटाळा !
आला पावसाळा , दादा आला पावसाळा !!
त्याच्यामुळे तुम्हा आम्हा, मिळे अन्नपाणी !
शेतकरी दादा , गातो आनंदाने गाणी !!
झाड लावा ,झाड जगवा, सृष्टीला सांभाळा !
आला पावसाळा , दादा आला पावसाळा !!
- विजय फडणीस - ठाणे, निवतृ - ६८ , ६०४- ७/ब अकोलेड को-ओप.सोसायटी, हाजुरी दर्गा रोड, ठाणे (प.)-४००६०४. , संपर्क :- २५८२४००० / ९००४६७०७३६ , vijay.phadnis48@gmail.com
____________________xxx_________________
१०. पाऊस
पाऊस आजकालइव्हेंट झालाय
पहिल्या पानावरली
बातमी झालाय
अधुनमधुन टिव्ही वर दिसणारी
पाऊस ब्रेकिंग न्यूज झालाय
पाऊस आजकाल
फॅशन झालाय
रोज बदलणारे
ट्रेंड्स झालाय
सामान्यांना न परवडणारे
पाऊस एक ड्रीम झालाय
पूस आजकाल
नॉटी झालाय
पेज थ्रीवरील
सेलिब्रिटी झालाय
चवीने चघळावे असे
सामान्यांना न परवडणारे
पाऊस एक ड्रीम झालाय
पूस आजकाल
नॉटी झालाय
पेज थ्रीवरील
सेलिब्रिटी झालाय
चवीने चघळावे असे
पाऊस एक गॉसीप झालाय
- डॉ. संजय शेषराव कुलकर्णी, उदगीर, संपर्क : 99606 12801
____________________xxx_________________
११. पावसा पावसा
भरून यावा पाऊस असा की
ओली व्हावी माती ,
बळीराज्याचा नांगर चालू दे ,
अभंग राहो नाती ---१—
नदी नाले गगनी घुमू दे ,
पक्षी गाणी गाती ,
पेरणीची भल्लरी गर्जू दे
तरारू दे पाती –२—
पाटामधुनी पाणी झुळू दे
थेंब झेलू दे हाती ,
सर्जा राजा गोठ्यात हलू दे ,
रातकिड्यांच्या राती –३—
तुझा नि माझा संग राहू दे
हात राहू दे पाठी
पावसा पावसा असाच वाग रे
सर्व तुझ्याच साठी –४—
- प्रदिप कासुर्डे
____________________xxx_________________
१२. गंधाळ पाऊस
सांज आभाळ पिवळे
कुणी गर्द काळोखीले,
ढग नाचती फिरूनी
वारा झुंजू-मुंजू बोले !!
झाडे गाती परसातं
घाली साद पावसाला,
मनी आरती घेवूनी
आली धरा स्वागताला !!
विजा कडाडती नभी
कुणी भांडतो आकाशी,
नभ ओथंबूनी आले
भेटावया क्षितिजाशी !!
जणू मृगाचा सोहळा
साज शृंगार सजला,
मेघ मल्हार सुरांनी
घनघोर बरसला !!
ओल्या मातीचा सुगंध
पसरला रानोमाळं,
प्रफुल्लित झाले सारे
धुंद सृष्टीचा गंधाळं !!
- कवी : विजय मधुसूदन जोशी, ए-204 नव-कृष्णाई को.ऑप.हौ.सो.लि., न्यू आयरे रोड, दिवा-वसई ब्रीज जवळ, डोंबिवली (पुर्व) -421 201, दूरध्वनी : 0251-2423369, भ्रमणध्वनी : 9892752242 , इ.मेल : vijayjoshi20@hotmail.com , वय : 48 वर्षे, शिक्षण : बी.कॉम, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, एम.बी.ए (मार्केटिंग मॅनेजमेंट)
____________________xxx_________________

No comments:
Post a Comment