अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीला शिवराळ ट्वीट, चौघांवर गुन्हा
गायिका-अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीने ट्विटरवर अझानविरोधी सूर आळवल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र सुचित्राविरोधात शिवराळ ट्वीट करणाऱ्या चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
![]() |
| सुचित्रा कृष्णमुर्ती |
‘कभी हां कभी ना’ चित्रपटात शाहरुखसोबत झळकलेल्या सुचित्रा कृष्णमूर्तीने काही दिवसांपूर्वी लाऊडस्पीकरवर अझान ऐकावं लागत असल्यामुळे सकाळ-सकाळी शांततेचा भंग होत असल्याची भावना ट्विटरवर व्यक्त केली होती.
सुचित्राच्या ट्वीटवर अनेक नेटिझन्सनी तोंडसुख घेतलं. त्यापैकी शिवराळ भाषेत ट्वीट करणाऱ्यांविरोधात सुचित्राने पोलिसात तक्रार दाखल केली होती. याची दखल घेऊन मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा नोंदवला.
अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीच्या अजानसंदर्भातील ट्वीटनं पुन्हा वाद
कलम ५०९ (महिलेच्या सन्मानाला धक्का पोहचवणाऱ्या भाषेचा वापर),कलम ६७ अ (लैंगिकतेशी संबंधित कृत्य असलेलं साहित्य प्रकाशित करण्याची शिक्षा) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगमनेही अझानसंदर्भात ट्वीट करुन आक्षेप नोंदवला होता. मी मुस्लिम नाही, तरी अझानच्या भोंग्यामुळे माझी झोपमोड का? असा सवाल करत, सोनूने वाद ओढवून घेतला होता.
.................................................
सनी लिऑन आई बनली, लातूरची मुलगी दत्तक घेतली!
![]() |
| सनी लियोन आणि मुलगी निशा |
बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑनने मुलगी दत्तक घेतली आहे. लातूरमधील२१ महिन्यांची मुलगी सनी लिऑन आणि तिचा पती डॅनिअल वेबर यांनी दत्तक घेतली आहे. निशा असे सनीने दत्तक घेतलेल्या २१ महिन्यांच्या गोंडस मुलीचं नाव आहे.
खरंतर सनी लिऑनने काही दिवसांपूर्वीच निशाला दत्तक घेतले होते. मात्र,याबाबतची घोषणा आता केलीदत्तक घेताना पालक मुलांना निवडतात. मात्र,इथे आम्ही निशाला निवडले नसून, तिनेच आम्हाला पालक म्हणून निवडले असल्याचे सनीने सांगितले. काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत सनी लिऑनला विचारण्यात आले होते की, ‘तुझ्या फॅमिलीबाबत तुझे काय प्लॅन आहेत?’ यावर उत्तर देताना सनी लिऑनने आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, तिने म्हटलं होतं की, “मी मुलांबाबत विचार करत आहे. मात्र,प्रेग्नंसीची भीती वाटते. त्याचबरोबर सध्या मी कामातही व्यस्त आहे.”
मुलगी दत्तक घेऊन सनी लिऑनने अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचललं आहे.
..................................................
...म्हणूनच या क्षेत्रात टिकले
सुंदर चेहरा आणि चांगली फिगर हे बॉलिवूड हिरॉइनचं लक्षण अभिनेत्री विद्या बालननं मोडून काढलं. सुंदर हिरॉइन म्हणून करियर करण्याऐवजी तिनं चांगली अभिनेत्री बनणं पसंत केलं. तिच्यासाठी हा प्रवास मात्र खूपच अवघड असल्याचं तिनं नुकतंच एका मुलाखतीत स्पष्ट केलं.
वेगळ्या भूमिका आणि सिनेमे स्वीकारण्यामागच्या कारणाबद्दल विद्या म्हणाली, ‘मी नेहमीच्या पठडीतल्या भूमिकांमध्ये बसत नव्हते आणि दुसरीकडे मला ‘कहानी’ सिनेमासारख्या वेगळ्या प्रकारच्या भूमिकांबद्दल विचारलं जात होतं. माझ्यासाठी त्या सगळ्या संधी निर्णायक ठरल्या. फक्त असेच सिनेमे रोज मिळणं शक्य नसतं आणि पर्यायानं तुम्ही इंडस्ट्रीत टिकून राहाण्याची शक्यता कमी होते. माझ्या बाबतीत म्हणाल, तर टिकून राहाण्याची जिद्दी, चिवट वृत्ती मला इथं फार उपयोगी पडली. चांगला अभिनेता नेहमीच भूमिकांसाठी, दुसऱ्या व्यक्तीचं आयुष्य जगण्यासाठी तहानलेला असतो. सुदैवानं मला अशा भूमिका मिळाल्या, ज्यांचं त्या त्या सिनेमातलं स्थान जबरदस्त होतं. अर्थातच व्यावसायिक यश मलाही आवडतंच, पण मी त्याचा कधी विचार करत नाही.’ विद्याच्या ‘कहानी २’ या सिनेमाला मात्र म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
दोन-तीन वर्षं सलग फिल्मफेअरचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक पटकावणारी विद्या अचानक या स्पर्धेतून काहीशी मागं पडल्यासारखी झाली. याचंही तिला फार दुःख नाही. ती म्हणाली, ‘मी टीव्ही मालिकांपासून माझा प्रवास सुरू केला होता. फिल्मफेअरची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होण्यापर्यंतच्या माझ्या मार्गात अनेक काटेकुटे पसरलेले होते मात्र मी तिथवर पोहचू शकले. अर्थात तिथं पोहोचल्यावर मी माझे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. दरवर्षी इथं तुम्हाला नामांकन मिळणं शक्य नाही. माधुरीसारखी एखादीच अभिनेत्री असते जिला करिअरमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी तब्बल चौदा नामांकनं मिळतात. मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे.

...............................................................

आयपीएल पण बीसीसीआयचा मात्र नकार
आपण मितालीशी सहमत असून महिला क्रिकेटच्या वाढीसाठी पावलं उचलली जातील असं आश्वासन मात्र बी.सी.सी.आयने दिलंय.
आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये अत्यंत चांगली कामगिरी करणाऱ्या मिताली राजने भारतातील महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल असावे अशी इच्छा व्यक्त केली होती. पण सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता महिला आय.पी.एल शक्य नाही असं बीसीसीआयचं म्हणणं आहे.
रविवारी वर्ल्ड कपमध्ये उपविजेतेपद पटकावल्यानंतर मिताली राजने भारतीय महिला क्रिकेटपटूंची परिस्थिती सुधारावी अशी इच्छा व्यक्त केली होती. तसंच त्यांना पुरूष क्रिकेटपटूंसारखाच आदर मिळावा अशी इच्छाही तिने व्यक्त केली होती. भारतीय महिला क्रिकेटपटूंना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्या असंही ती म्हणाली. त्यातच महिला क्रिकेटच्या वाढीसाठी आय.पी.एल.ही घेण्यात यावं अशीही इच्छा तिने व्यक्त केली.
पण बीसीसीआयची सध्याची परिस्थिती पाहता महिला आय.पी.एल घेता येणार नाही अशी माहिती बीसीसीआयने दिली. पण आपण मितालीशी सहमत असून महिला क्रिकेटच्या वाढीसाठी पावलं उचलली जातील असं आश्वासन मात्र बीसीसीआयने दिलंय
................................................................
पहिलं मेडल लिलावात
आजच्याच दिवशी 65 वर्षांपूर्वी भारताला ऑलम्पिकमधील पहिले मेडल मिळाले. पण देशासाठी अनमोल असणारं हे मेडल दुर्दैवाने आज लिलावात काढण्यात आलं आहे
भारताला पहिलंवहिलं ऑलिम्पिक मेडल मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या गोळेश्वर गावातली ही छोटीशी तालीम. खाशाबांची आठवण म्हणून बांधलेली. गावातली लहान मुलं इथं सराव करतात. पण ज्या गावात ऑलिम्पिकवीर कुस्तीपटू जन्मला त्याच गावात केवळ ही तालिम सोडली तर कुस्तीपटूंसाठी कोणत्याच सुविधा नाहीत.
गोळेश्वरमध्ये जागतिक कुस्ती संकुल व्हावं, यासाठी खाशाबाचे कुटुंबीय आणि गावकरी वर्षानुवर्षे पाठपुरावा करतायत. यासाठी स्वतः खाशाबांच्या कुटुंबीयांनी जमीन देऊ केली. पण सरकारनं वारंवार आश्वासन देऊनही ते पाळलं नाही.त्यामुळे आता ऑलिम्पिक मेडलच लिलावात काढून हे स्वप्न पूर्ण करण्याची तयारी गावकऱ्यांनी केलीय.
मुर्दाड प्रशासनाचा लाल फितशाहीचा कारभार आणि प्रबळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ उभारल्या जाणाऱ्या कुस्ती संकुलाचं काम रखडलंय.
खाशाबा यांच्यानंतर भारताला ऑलम्पिक मध्ये मेडल मिळवायला तब्बल 44 वर्षे वाट पहावी लागली. पण, दुर्दैवाने खाशाबा जाधवसारख्या महान खेळाडूच्या नशिबी जिवंतपणी आणि मरणोत्तरही अवहेलनाच वाट्याला आलीय. भारताचा गौरव असलेल्या पहिल्यावहिल्या मेडलची विक्री होण्याआधी क्रीडा मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना जाग येणार का हेच पाहायचं ?
...............................................................
या क्षेत्रात करिअर करण्यासाठी उमेदवाराने किमान जीवशास्त्रात किंवा मरिन सायन्समध्ये एम.एस्सी अथवा पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी. मात्र, बारावीमध्ये विज्ञानशाखेत जीवशास्त्र विषय असणे आणि जीवशास्त्रातून पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांतर्गत ओशनोग्राफी, फिशरीज टेक्नॉलॉजी, सागरी जैवशास्त्र, सागरी प्राणिशास्त्र यांसारख्या विषयांमध्ये स्पेशलायझेशन तसेच पीएच.डी करता येते. यामध्ये मॉलिक्युलर बायोलॉजी, अॅक्वाकल्चर जेनेटिक्स, मरिन फिजिओलॉजी, मरिन मॅमोलॉजी, मरिन पोल्युशन, मरिन इकोसिस्टीम्स, कोरल रीफ इकोलॉजी, केमिकल इकोलॉजी या विषयांचा समावेश आहे.
करिअर संधी : सागरी जीवसृष्टीविषयी आस्था असणाऱ्या उमेदवारांना या ज्ञानशाखेचा अभ्यास करणे आनंददायी ठरू शकते. या ज्ञानशाखेतील विद्यार्थ्यांना अधिकाधिक वेळ सागरकिनारे आणि प्रत्यक्ष सागरावर व्यतीत करावा लागतो. सागराच्या अंतर्गत भागात जाऊन संशोधन करावे लागते. सागरी जैवशास्त्रज्ञांना शासकीय संस्था, संशोधन प्रयोगशाळा, मत्स्यालये, अध्यापन, सागरी पर्यावरणशास्त्रज्ञ अशा विविध करिअर संधी मिळू शकतात. ओशनोग्राफी केंद्रे, संशोधन बोटी आणि पाणबुडय़ा येथे काम करता येते. सागरी पर्यावरण, प्रदूषण आणि जैवविविधता कार्यक्षेत्रात कार्यरत असणारी मंडळे, स्वयंसेवी संस्था, औषधनिर्मिती कंपन्या यांच्यासोबत संशोधन प्रकल्प राबवता येतात.
या अभ्यासक्रमांद्वारे प्रामुख्याने छंद स्वरूपात जोपासल्या गेलेल्या विषयांचे प्रशिक्षण मिळू शकते. या प्रशिक्षणानंतर जे कौशल्य प्राप्त होते त्याचा प्रभावी व सर्जनशील वापर करता आला तर करिअरच्या विपुल संधी मिळू शकतात. हे क्षेत्र अतिशय स्पर्धात्मक असल्याने परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागते. स्वत:ला सतत अपडेट ठेवावे लागते.
हे अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांची तसेच काही अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांची माहिती देत आहोत-
स्कूल ऑफ ब्रॉडकास्टिंग अॅण्ड कम्युनिकेशन :
एएएफटी स्कूल ऑफ सिनेमा :
जगातली सर्वांत प्राचीन, तसेच सर्व भाषांची जननी असलेल्या संस्कृतला आता तरुणाईची पसंती वाढली आहे. मुंबई विद्यापीठ अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या संस्कृतविषयक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा असलेला पाहायला मिळतोय.
पेंट टेक्नॉलॉजी या रंगाचा शास्त्रीय अभ्यास करण्याच्या शाखेचा उपयोग अनेक व्यवसायात केला जातो. रंग जरी आपल्याला आकर्षित करत असले तरी अनेक वेळा त्यांचा उपयोग एखाद्या गोष्टीचं संरक्षण करण्यासाठी प्रामुख्यानं केला जातो. खासकरून लोखंडी वस्तू गंजू नयेत, वातावरणाचा परिणाम वस्तूवर होऊ नये व वस्तू बऱ्याच काळापर्यंत टिकून राहाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणावर रंगांचा उपयोग होतो.
रंगामध्ये विविध काम करण्यासाठी अनेक रासायनिक द्रव्यांचा वापर केलेला असतो. रंग बनवताना घन स्वरूपातील रंगाला द्राव्य माध्यमामध्ये मिसळलं जातं. विविध वस्तूंवर संरक्षणासाठी अथवा सजावटीसाठी रंगाचा वापर केला जातो. रंगामधील रासायनिक द्रव्यांचा समावेश त्यांच्या उपयोगानुसार केला जातो. (उदा. गंजप्रतिरोधकता). पेंट टेक्नॉलॉजीमध्ये विविध घटकपदार्थांचा (उदाहरणार्थ राळ, पॉलिमर, नैसर्गिक रंग इत्यादी) अभ्यास करावा लागतो, जे रंग बनवण्यासाठी वापरले जातात. रंगात वापरण्यात येणाऱ्या घटकद्रव्यांच्या गुणधर्माचा अभ्यास करून रंगामध्ये त्यांच्या उपयोगितेचं परीक्षण करावं लागतं. विविध पृष्ठभागांवर त्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार विविध प्रकारच्या रंगांची निर्मिती केली जाते. विविध उद्योगांकडून असणाऱ्या आवश्यकतांचा पेंट टेक्नॉलॉजीमध्ये अभ्यास केला जातो.
उदाहरणार्थ, जहाजांना दिल्या जाणाऱ्या रंगांमध्ये गंजप्रतिरोधकता व खाऱ्या पाण्याचा धातूवर होणाऱ्या परिणामांपासून संरक्षण, हे महत्त्वाचं ठरतं. धूळ व पावसापासून इमारतीचं रक्षण करणं, हे महत्त्वाचं असतं. मोटारीसाठी वापरण्यात येणाऱ्या रंगामध्ये वर्षांनुवर्षे चकचकीतपणा टिकणं, वातावरणाचा त्यावर कमीत कमी परिणाम होणं, हे आवश्यक आहे. घरगुती वापरातील रंगामध्ये पापुद्रा न पडणारा तसंच पाण्याने स्वच्छ करता येणारा, हा विशेष गुणधर्म पाहिला जातो. लहान मुलांच्या रंगीत खडूंमध्ये विषारी द्रव्यांचा वापर न करणं आवश्यक असतं. त्या त्या व्यवसायातील आवश्यकतेचा विचार रंगनिर्मिती करताना आवश्यक असतो.
- इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, माटुंगा, मुंबई
- या संस्थेमध्ये बी. टेक्. (पेंट टेक्नॉलॉजी) हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. तसंच एम. टेक्. (पेंट टेक्नॉलॉजी) हा पदव्युत्तर अभ्यासक्रमदेखील उपलब्ध आहे.
- डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे टेक्निकल इन्स्टिट्यूट, डेक्कन जिमखाना, पुणे
- या संस्थेमध्ये डिप्लोमा इन सर्फेस कोटिंग टेक्नॉलॉजी हा १२वी विज्ञान शाखेनंतरचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
- गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अॅण्ड डेव्हलपमेंट, विद्यानगरी, कलिना कॅम्पस, सांताक्रूझ (पू.)
-. आनंद मापुस्कर
- या संस्थेमध्ये १२वी विज्ञान शाखेनंतरचा डिप्लोमा इन पेंट अॅप्लिकेशन हा अडीच वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
सागरी जैवशास्त्राचा अभ्यास
सागरी जैवशास्त्राशी संबंधित विविध अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती आणि करिअर संधींची ओळख..
सागरी जैवशास्त्राअंतर्गत समुद्री पर्यावरणात अंतर्भूत होणाऱ्या प्रत्येक घटकाचा अभ्यास केला जातो. त्यात समुद्री जलचरांचा आणि वनस्पतींचाही समावेश होतो. समुद्री परिसंस्था, समुद्री सस्तन प्राणी, अॅक्वाकल्चर, समुद्राचे रासायनिक आणि पदार्थविज्ञानविषयक गुण आणि पाणथळ जागा आदी स्पेशलायझेशनची क्षेत्रे आहेत. जलपर्यावरणावर मानवी व्यवहारांचे होणारे परिणाम, सागरी जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन या विषयाचा अभ्यास केला जातो.
या क्षेत्रात करिअर करण्यासाठी उमेदवाराने किमान जीवशास्त्रात किंवा मरिन सायन्समध्ये एम.एस्सी अथवा पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी. मात्र, बारावीमध्ये विज्ञानशाखेत जीवशास्त्र विषय असणे आणि जीवशास्त्रातून पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांतर्गत ओशनोग्राफी, फिशरीज टेक्नॉलॉजी, सागरी जैवशास्त्र, सागरी प्राणिशास्त्र यांसारख्या विषयांमध्ये स्पेशलायझेशन तसेच पीएच.डी करता येते. यामध्ये मॉलिक्युलर बायोलॉजी, अॅक्वाकल्चर जेनेटिक्स, मरिन फिजिओलॉजी, मरिन मॅमोलॉजी, मरिन पोल्युशन, मरिन इकोसिस्टीम्स, कोरल रीफ इकोलॉजी, केमिकल इकोलॉजी या विषयांचा समावेश आहे.
करिअर संधी : सागरी जीवसृष्टीविषयी आस्था असणाऱ्या उमेदवारांना या ज्ञानशाखेचा अभ्यास करणे आनंददायी ठरू शकते. या ज्ञानशाखेतील विद्यार्थ्यांना अधिकाधिक वेळ सागरकिनारे आणि प्रत्यक्ष सागरावर व्यतीत करावा लागतो. सागराच्या अंतर्गत भागात जाऊन संशोधन करावे लागते. सागरी जैवशास्त्रज्ञांना शासकीय संस्था, संशोधन प्रयोगशाळा, मत्स्यालये, अध्यापन, सागरी पर्यावरणशास्त्रज्ञ अशा विविध करिअर संधी मिळू शकतात. ओशनोग्राफी केंद्रे, संशोधन बोटी आणि पाणबुडय़ा येथे काम करता येते. सागरी पर्यावरण, प्रदूषण आणि जैवविविधता कार्यक्षेत्रात कार्यरत असणारी मंडळे, स्वयंसेवी संस्था, औषधनिर्मिती कंपन्या यांच्यासोबत संशोधन प्रकल्प राबवता येतात.
अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या काही संस्था :
कोचीन युनिव्हर्सटिी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी:
* डिपार्टमेंट ऑफ मरिन बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी अॅण्ड बायोकेमिस्ट्री- एम.एस्सी इन मरिन बायोलॉजी. कालावधी- दोन वष्रे. अर्हता- जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र या विषयांसह बी.एस्सी. प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते.
* डिपार्टमेंट मरिन जिऑलॉजी आणि जिओफिजिक्स- एम.एस्सी टेक इन मरिन जिऑलॉजी. कालावधी- दोन वष्रे. याच विषयात पीएच.डी करता येते. हा अभ्यासक्रम सागरी धातू/ खनिजांचा शोध, हायड्रोकार्बनचा अभ्यास, अंटाकर्टका संशोधन या विषयांवर भर दिला जातो.
* डिपार्टमेंट ऑफ फिजिकल ओशनोग्राफी- १. एम.एस्सी. इन फिजिकल ओशनोग्राफी (अर्हता- ५५ टक्के गुणांसह भौतिकशास्त्र आणि गणित या विषयासह पदवी.) २. पीएच.डी. अभ्यासक्रमात कोस्टल झोन मॅनजमेंट, रिव्हर इनपुट्स इन ओशन सिस्टीम, अकॉस्टिक ओशनोग्राफी या विषयांवर लक्ष केंद्रित केले जाते.
* डिपार्टमेंट ऑफ मरिन बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी अॅण्ड बायोकेमिस्ट्री : एम.एस्सी. इन मरिन बायोलॉजी आणि पीएच.डी या विभागाने हायड्रोग्राफी, इश्चुराइन फ्लोरा, बॉटम फ्लोरा, प्रॉन फिशरी रिसोस्रेस, फिशरी बायोलॉजी, मरिन पोल्युशन, फिजिऑलॉजी ऑफ मरिन अॅनिमल्स, प्रॉडक्टिव्हिटी ऑफ इन्शोर वॉटर्स मरिन मायक्रोबायोलॉजी अॅण्ड बायोकेमिस्ट्री आदी विषयांच्या संशोधनावर लक्ष केंद्रित केले आहे.
* डिपार्टमेंट ऑफ केमिकल ओशनोग्राफी- एम.एस्सी. (हायड्रोकेमिस्ट्री)आणि एम.फिल (केमिकल ओशनोग्राफी). सागरी जलपर्यावरण, जलप्रदूषण संनियंत्रण, प्रदूषणाचा जीवसृष्टीवर होणारा परिणाम, सागरी संसाधनाचे व्यवस्थापन, किनारा प्रदेश व्यवस्थापन या विषयांवरही लक्ष केंद्रित केले जाते.
संपर्क- थिकक्कारा, साऊथ कलामेस्सेरी, कोची,
केरळ- ६८२०२२. संकेतस्थळ- www.vnsgu.ac.in
वीर नर्मद दक्षिण गुजराथ विद्यापीठ :
या संस्थेच्या डिपार्टमेंट ऑफ अॅक्वॉटिक बायोलॉजीमार्फत पुढील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत-
* एम.एस्सी इन अॅक्वॉटिक बायोलॉजी : अर्हता- जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, मत्स्यशास्त्र, औद्योगिक मत्स्यशास्त्र, सागरी विज्ञान, पर्यावरणशास्त्र, जैवतंत्रज्ञानशास्त्र यांपकी कोणत्याही एका विषयासह पदवी. ल्लएम.फिल इन अॅक्वॉटिक बायोलॉजी : अर्हता- संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी.
* पीएच.डी इन अॅक्वॉटिक बायोलॉजी : अर्हता- संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी. संपर्क- रजिस्ट्रार, वीर नर्मद दक्षिण गुजराथ विद्यापीठ, सुरत- ३८५००७.
संकेतस्थळ- www.cusat.ac.in
कर्नाटक युनिव्हर्सटिी, डिपार्टमेंट ऑफ मरिन बायोलॉजी: संस्थेचे अभ्यासक्रम- एम.एस्सी इन मरिन बायोलॉजी आणि एम.फिल इन मरिन बायोलॉजी.
संपर्क- कर्नाटक युनिव्हर्सटिी, पोस्ट ग्रॅज्युएट सेंटर कोडिबाग,
संपर्क- कर्नाटक युनिव्हर्सटिी, पोस्ट ग्रॅज्युएट सेंटर कोडिबाग,
कारवार- ५८१३०३ कर्नाटक.
कोलकाता युनिव्हर्सटिी, डिपार्टमेंट ऑफ मरिन सायन्स : एम.एस्सी इन मरिन सायन्स, अर्हता- बी.एस्सी आणि पीएच.डी इन मरिन सायन्स हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
संपर्क- ३५, बॅलीगुंगे सक्र्युलर रोड, कोलकाता- ७०००१९.
संपर्क- ३५, बॅलीगुंगे सक्र्युलर रोड, कोलकाता- ७०००१९.
संकेतस्थळ- www.vnsgu.ac.in
आंध्र युनिव्हर्सटिी, डिपार्टमेंट ऑफ मरिन लिव्हिग रिसोस्रेस: संस्थेचे अभ्यासक्रम- एम.एस्सी इन मरिन बायोटेक्नॉलॉजी ल्लएम.एस्सी इन मरिन बायोलॉजी अॅण्ड फिशरीज. एम.एस्सी इन कोस्टल अॅक्वाकल्चर अॅण्ड मरिन बायोटेक्नॉलॉजी.
संपर्क- डिपार्टमेंट ऑफ मरिन लिव्हिग रिसोस्रेस, कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी, आंध्र युनिव्हर्सटिी, विशाखापट्टणम- ५३०००३.
संपर्क- डिपार्टमेंट ऑफ मरिन लिव्हिग रिसोस्रेस, कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी, आंध्र युनिव्हर्सटिी, विशाखापट्टणम- ५३०००३.
संकेतस्थळ- www.caluniv.ac.in
गोवा विद्यापीठ : अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
* डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी- एम.एस्सी इन मरिन मायक्रोबायोलॉजी.
* डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी- एम.एस्सी इन मरिन बायोटेक्नॉलॉजी.
* डिपार्टमेंट ऑफ मरिन सायन्स- एम.एस्सी इन मरिन सायन्स. कालावधी- प्रत्येकी दोन वष्रे.
संपर्क- गोवा विद्यापीठ,
संपर्क- गोवा विद्यापीठ,
गोवा- ४०३२०६. संकेतस्थळ- andhrauniversity.edu.in
केरळ युनिव्हर्सटिी ऑफ फिशरीज अॅण्ड ओशन सायन्स: अभ्यासक्रम- मास्टर ऑफ फिशरी सायन्स इन अॅक्वाकल्चर, फिश बायोटेक्नॉलॉजी, अॅक्वॉटिक अॅनिमल हेल्थ मॅनेजमेंट, अॅक्वॉटिक अॅनिमल एन्व्हायरॉन्मेट मॅनेजमेंट, फिश जेनेटिक्स अॅण्ड ब्रीडिंग फिश न्युट्रिशन अॅण्ड फीड टेक्नॉलॉजी, फिशरीज इकॉनॉमिक्स, फिशरीज रिसोर्स मॅनेजमेंट.
संपर्क- केरळ युनिव्हर्सटिी ऑफ फिशरीज अॅण्ड ओशन सायन्स, पानागड, कोची- ६८२५०६. संकेतस्थळ- www.unigoa.ac.in
संपर्क- केरळ युनिव्हर्सटिी ऑफ फिशरीज अॅण्ड ओशन सायन्स, पानागड, कोची- ६८२५०६. संकेतस्थळ- www.unigoa.ac.in
नॅशनल सेंटर फॉर अंटाíक्टक अॅण्ड ओशन रिसर्च या संस्थेमार्फत अंटाíक्टका येथे संशोधन इंटर्नशीप करण्याची संधी इच्छुक विद्यार्थ्यांना दिली जाते. हा कालावधी दरवर्षी मे ते जून असा असतो. यासाठी जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात संपर्क साधता येतो.
संपर्क- डायरेक्टर, नॅशनल सेंटर फॉर अंटाíक्टक अॅण्ड रिसर्च ओशन, वास्को, गोवा- ४०३८०२.
संपर्क- डायरेक्टर, नॅशनल सेंटर फॉर अंटाíक्टक अॅण्ड रिसर्च ओशन, वास्को, गोवा- ४०३८०२.
संकेतस्थळ- www.ncaor.gov.in
...........................................................
मनोरंजन क्षेत्रातील संधी
जाहिरात, चित्रपट, दूरचित्रवाणी यांसारख्या मनोरंजन क्षेत्राशी संबंधित क्षेत्रांतील अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती..
चित्रपट, रेडिओ, दूरचित्रवाणी, जाहिरात या क्षेत्रांत करिअर करण्यासाठी दीर्घ मुदतीचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम निश्चितच उपयुक्त ठरतात. मात्र, हे दीर्घ मुदतीचे अभ्यासक्रम करणे ज्या विद्यार्थ्यांना शक्य होत नाही आणि ज्यांना या क्षेत्रात करिअर करण्याची आवड, इच्छा आणि कल आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी काही संस्थांनी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम प्रमाणपत्र अथवा पदविका स्तरावरील असतात.
या अभ्यासक्रमांद्वारे प्रामुख्याने छंद स्वरूपात जोपासल्या गेलेल्या विषयांचे प्रशिक्षण मिळू शकते. या प्रशिक्षणानंतर जे कौशल्य प्राप्त होते त्याचा प्रभावी व सर्जनशील वापर करता आला तर करिअरच्या विपुल संधी मिळू शकतात. हे क्षेत्र अतिशय स्पर्धात्मक असल्याने परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागते. स्वत:ला सतत अपडेट ठेवावे लागते.
हे अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांची तसेच काही अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांची माहिती देत आहोत-
स्कूल ऑफ ब्रॉडकास्टिंग अॅण्ड कम्युनिकेशन :
* सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग.
* स्क्रिप्ट रायटिंग अॅण्ड डायरेक्शन फॉर फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन.
संपर्क- स्कूल ऑफ ब्रॉडकॉस्टिंग अॅण्ड कम्युनिकेशन, अंधाक्षी बिल्डिंग ३७, अंधेरी रिक्रिएशन क्लबच्या पाठीमागे, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०००५८.
संकेतस्थळ- www.sbc.ac.in ईमेल- info@ sbc.ac.in
एएएफटी स्कूल ऑफ सिनेमा :
संस्थेने ३ महिने कालावधीचे पुढील अभ्यासक्रम सुरू
केले आहेत- ल्लप्रॉडक्शन डायरेक्शन अॅण्ड टीव्ही जर्नालिझम ल्लव्हिडीओ एडिटिंग अॅण्ड साऊंड रेकॉìडग, कॅमेरा अॅण्ड लायटिंग टेक्निक्स ल्लस्क्रीनप्ले रायटिंग ल्लसाऊंड रेकॉìडग अॅण्ड रेडिओ प्रॉडक्शन.
संपर्क- मारवाह स्टुडिओ कॉम्प्लेक्स, एफसी- १४/१५, फिल्म सिटी, सेक्टर- १६ ए, नॉयडा, उत्तर प्रदेश.
संकेतस्थळ- www.aaft.com ईमेल- help@aaft.com
अन्नपूर्णा इंटरनॅशनल स्कूल ऑफ फिल्म अॅण्ड मीडिया :
* इंट्रोडक्शन टू फिल्म डायरेक्शन. कालावधी- १० आठवडे.
* अॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन थ्री डी अॅनिमेशन अॅण्ड व्हीएफएक्स. कालावधी- एक वर्ष.
संपर्क- अन्नपूर्णा स्टुडिओ, रोड टू, बंजारा हिल्स,
हैदराबाद- ३४. संकेतस्थळ- www.aisfm.edu.in
ईमेल- info@ aisfm.edu.in
देवीप्रसाद गोयंका मॅनेजमेंट कॉलेज ऑफ मीडिया स्टडीज :
* सर्टिफिकेट कोर्स इन साऊंड इंजिनीअिरग. कालावधी- ९ महिने. ल्लसर्टिफिकेट कोर्स डिजिटल फिल्म मेकिंग. कालावधी- ११ महिने.
संपर्क- आरएसईटी कॅम्पस, एस.व्ही रोड, मालाड (प.), मुंबई- ४०००६४. संकेतस्थळ- www.dgmcms.org.in
ईमेल- info@dgmcms.org.in
झी इन्स्टिटय़ूट ऑफ मीडिया आर्ट्स :
संस्थेचे अभ्यासक्रम- फिल्म अॅण्ड टीव्ही प्रॉडक्शन. कालावधी- सहा महिने. या अभ्यासक्रमामध्ये चित्रपटनिर्मितीसाठी आवश्यक अशा निर्मिती, वितरण, प्रदर्शन, कायदेशीर बाजू, विविध परवानग्या, वित्त आणि अर्थनियोजन, विक्री, प्रसिद्धी आदी बाबींची माहिती देण्यात येते.
संपर्क- ३, आशिकी बंगला, शास्त्रीनगर, पहिली गल्ली, एचडीएफसी बँकेच्या विरुद्ध दिशेला, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०००५३.
संकेतस्थळ- www.zimainstitute.com/cinematography
सेंट पॉल्स इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन एज्युकेशन :
संस्थेचे अभ्यासक्रम- ल्लसर्टिफिकेट कोर्स इन अॅडव्हर्टायजिंग अॅण्ड कॉपी रायटिंग. कालावधी- तीन महिने.
* सर्टिफिकेट कोर्स इन व्हीडिओग्राफी. कालावधी- तीन महिने.
* सर्टिफिकेट कोर्स इन इव्हेन्ट्स. कालावधी- तीन महिने.
* अॅडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन पब्लिक रिलेशन अॅण्ड कॉर्पोरेट कम्युनिकेशन. कालावधी- सहा महिने.
* अॅडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन अॅडव्हर्टायजिंग मॅनेजमेंट. कालावधी- सहा महिने. हे अभ्यासक्रम टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स स्कूल ऑफ व्होकेशनल स्टडीजच्या सहकार्याने सुरू करण्यात आले आहेत.
* डिप्लोमा इन स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंग- या संस्थेने एक वर्ष कालावधीचा डिप्लोमा इन स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंग हा अंशकालीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. क्रीडा प्रसारणासाठी आवश्यक असणारी तंत्रकौशल्ये या अभ्यासक्रमात शिकवली जातात. क्रीडासंदर्भातील लिखाण आणि सादरीकरण, व्हीडिओ निर्मिती तंत्र, प्रसारण, क्रीडाविषयक उपक्रमांची आखणी व नियोजन आदी बाबींचाही या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. संपर्क- २४ रस्ता, टीपीएस ३, वांद्रे (पश्चिम),
मुंबई- ४०००५०. संकेतस्थळ- www.stpaulscice.com
ईमेल- info@stpaulscice.com
व्हिसिलग वूड इंटरनॅशनल :
या संस्थेने टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सच्या स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन या संस्थेच्या सहकार्याने चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात नोकरी तसेच स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरू शकतील असे व्होकेशनल अभ्यासक्रम सुरू केले आहेत. कालावधी- ३ महिने. अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
सर्टिफिकेट इन व्हीडिओग्राफी.
सर्टिफिकेट इन व्हीडिओग्राफी.
* सर्टिफिकेट इन स्टील फोटोग्राफी.
* सर्टिफिकेट इन रोटो पेंट (व्हिज्युअल इफेक्ट्स).
* सर्टिफिकेट इन साऊंड रेकॉìडग.
* सर्टिफिकेट इन इंट्रोडक्शन टू ऑडिओ- व्हिज्युअल्स. कालावधी- सहा महिने.
* अॅडव्हान्स्ड सर्टिफिकेट इन एडिटिंग सॉफ्टवेअर ऑपरेशन.
* अॅडव्हान्स्ड सर्टिफिकेट इन स्टुडिओ साऊंड रेकॉडिंग.
* सर्टिफिकेट इन टू डी कॅरेक्टर डिझाइन. कालावधी- १० आठवडे. अर्हता- ललित कलामधील पदवी.
* सर्टिफिकेट इन अॅडव्हर्टायजिंग रायटिंग. कालावधी- १० आठवडे. अर्हता- इंग्रजीचे ज्ञान.
* सर्टिफिकेट इन मेकअप अॅण्ड हेअर. कालावधी- १० आठवडे. अर्हता- दहावी-बारावी.
संपर्क- व्हिसिलग वूड इंटरनॅशनल, फिल्मसिटी कॉम्प्लेक्स, गोरेगाव (पूर्व),
संपर्क- व्हिसिलग वूड इंटरनॅशनल, फिल्मसिटी कॉम्प्लेक्स, गोरेगाव (पूर्व),
मुंबई- ४०००६५. संकेतस्थळ- www.whistlingwoods.net
ईमेल- admissions@ whistlingwoods.net
रिलायन्स अॅनिमेशन :
या संस्थेत फंडामेंटल्स ऑफ फिल्म मेकिंग हा अभ्यासक्रम करता येतो. डिजिटल चित्रपटनिर्मितीचे प्रारंभीचे मूलभूत प्रशिक्षण या अभ्यासक्रमात दिले जाते. अर्हता- दहावी/बारावी. कालावधी- दोन महिने.
संपर्क- ३०१, बी विंग, बिझनेस पॉइंट, पालीराम रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०००५८. संकेतस्थळ- www.relianceaims.com
संपर्क- ३०१, बी विंग, बिझनेस पॉइंट, पालीराम रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०००५८. संकेतस्थळ- www.relianceaims.com
डिप्लोमा इन रेडिओलॉजिक फिजिक्स
मुंबईच्या भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरने डिप्लोमा इन रेडिओलॉजिक फिजिक्स हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- एक वर्ष. अर्हता- एम.एस्सी. भौतिकशास्त्र. विद्यार्थ्यांना ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
हा अभ्यासक्रम होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूटच्या अंतर्गत चालवला जातो.
संकेतस्थळ- www.barc.gov.in आणि www.hbni.ac.in
.......................................................................
'संस्कृत’ मय करिअर
जगातली सर्वांत प्राचीन, तसेच सर्व भाषांची जननी असलेल्या संस्कृतला आता तरुणाईची पसंती वाढली आहे. मुंबई विद्यापीठ अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या संस्कृतविषयक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा असलेला पाहायला मिळतोय.
संस्कृत भाषेबद्दलची जिज्ञासा सध्या वाढत आहे. भारताच्या प्राचीन इतिहासाचा सुवर्णमयी वारसा व देवांची भाषा असा नावलौकिक मिळालेली गीर्वाण भारती संस्कृत आपल्या सर्व भारतीय भाषांची आद्य भाषा आहे. आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगात मोठ्या प्रमाणात माहितीचा भडिमार होताना दिसतो आहे. या भरमसाठ माहितीतील नेमकी खरी माहिती कोणती हा पेच सर्वांनाच पडला आहे. खरी माहिती जाणून घेण्यासाठी संस्कृत भाषेचा आधार घ्यावा लागतो आहे आणि म्हणूनच संस्कृत भाषेचा भाव वधारला आहे.
गेल्यावर्षी मुंबई विद्यापीठातील संस्कृत विभागात विविध संस्कृत अभ्यासक्रमांसाठी ४३० विद्यार्थी होते. हा आकडा दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेने दुप्पट आहे. संस्कृत भाषेकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल पाहता यंदा हा आकडा ५००पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. संस्कृतमधील विविध क्षेत्रांमध्ये, विशेषतः साहित्य क्षेत्रामध्ये संशोधनाची प्रचंड आवश्यकता आहे. विविध संस्था वेद, उपनिषदे, प्राचीन साहित्य, प्राचीन शिलालेख इत्यादी विषयांवर संशोधन करीत असतात. इतिहास या क्षेत्रात संस्कृतच्या अभ्यासकांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या विषयात संशोधन करण्यासाठी प्रचंड संधी आहे. विशेष म्हणचे गेल्या तीन-चार वर्षांत संस्कृतचे महत्त्व वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे पौराणिक, ऐतिहासिक सिनेमा आणि टीव्ही मालिका. विविध पौराणिक कथांविषयी लिखाण करण्यासाठी, सिनेमा तसेच मालिकांसाठी संवाद लिहिण्यासाठी संस्कृत अभ्यासकांची मागणी सध्या वाढली आहे.

संस्कृत भाषेकडे विद्यार्थी वळत आहेत. संस्कृत भाषेवर उत्तम प्रभुत्व मिळवणे खूप महत्त्वाचे असते. संस्कृत भाषा खूप सोपी आहे. संस्कृत अभ्यासाबरोबर पाली, मोडी, प्राकृत लिपीदेखील विद्यार्थ्यांनी शिकावी. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगला रोजगार मिळू शकेल.संस्कृतविषयक अभ्यासक्रम
मुंबई विद्यापीठाचे एकूण १५ वेगवेगळे संस्कृतविषयक अभ्यासक्रम आहेत. यात डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्स, एमए, एमफील, पीएचडी असे स्तर आहेत. त्याचबरोबर के. जे. सोमैया भारतीय संस्कृतपिठम्, भारतीय विद्या भवन आदी संस्थांमधून विद्यार्थी संस्कृत विषयात शिक्षण घेऊ शकतात. यामध्ये वेद, वेदांत, व्याकरण, अलंकार, मायथॉलॉजी, मॅनुस्क्रिप्टओलॉजी, प्राकृत, मिस्टिसीजम आदींचे सखोल शिक्षण घेता येते.
डॉ. माधवी नरसाळे, संस्कृत विभागप्रमुख (मुंबई विद्यापीठ)

पेंट टेक्नॉलॉजीचे रंगीत विश्व
पेंट टेक्नॉलॉजी या रंगाचा शास्त्रीय अभ्यास करण्याच्या शाखेचा उपयोग अनेक व्यवसायात केला जातो. रंग जरी आपल्याला आकर्षित करत असले तरी अनेक वेळा त्यांचा उपयोग एखाद्या गोष्टीचं संरक्षण करण्यासाठी प्रामुख्यानं केला जातो. खासकरून लोखंडी वस्तू गंजू नयेत, वातावरणाचा परिणाम वस्तूवर होऊ नये व वस्तू बऱ्याच काळापर्यंत टिकून राहाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणावर रंगांचा उपयोग होतो.रंगामध्ये विविध काम करण्यासाठी अनेक रासायनिक द्रव्यांचा वापर केलेला असतो. रंग बनवताना घन स्वरूपातील रंगाला द्राव्य माध्यमामध्ये मिसळलं जातं. विविध वस्तूंवर संरक्षणासाठी अथवा सजावटीसाठी रंगाचा वापर केला जातो. रंगामधील रासायनिक द्रव्यांचा समावेश त्यांच्या उपयोगानुसार केला जातो. (उदा. गंजप्रतिरोधकता). पेंट टेक्नॉलॉजीमध्ये विविध घटकपदार्थांचा (उदाहरणार्थ राळ, पॉलिमर, नैसर्गिक रंग इत्यादी) अभ्यास करावा लागतो, जे रंग बनवण्यासाठी वापरले जातात. रंगात वापरण्यात येणाऱ्या घटकद्रव्यांच्या गुणधर्माचा अभ्यास करून रंगामध्ये त्यांच्या उपयोगितेचं परीक्षण करावं लागतं. विविध पृष्ठभागांवर त्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार विविध प्रकारच्या रंगांची निर्मिती केली जाते. विविध उद्योगांकडून असणाऱ्या आवश्यकतांचा पेंट टेक्नॉलॉजीमध्ये अभ्यास केला जातो.
उदाहरणार्थ, जहाजांना दिल्या जाणाऱ्या रंगांमध्ये गंजप्रतिरोधकता व खाऱ्या पाण्याचा धातूवर होणाऱ्या परिणामांपासून संरक्षण, हे महत्त्वाचं ठरतं. धूळ व पावसापासून इमारतीचं रक्षण करणं, हे महत्त्वाचं असतं. मोटारीसाठी वापरण्यात येणाऱ्या रंगामध्ये वर्षांनुवर्षे चकचकीतपणा टिकणं, वातावरणाचा त्यावर कमीत कमी परिणाम होणं, हे आवश्यक आहे. घरगुती वापरातील रंगामध्ये पापुद्रा न पडणारा तसंच पाण्याने स्वच्छ करता येणारा, हा विशेष गुणधर्म पाहिला जातो. लहान मुलांच्या रंगीत खडूंमध्ये विषारी द्रव्यांचा वापर न करणं आवश्यक असतं. त्या त्या व्यवसायातील आवश्यकतेचा विचार रंगनिर्मिती करताना आवश्यक असतो.
अभ्यासक्रम
- या संस्थेमध्ये बी. टेक्. (पेंट टेक्नॉलॉजी) हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. तसंच एम. टेक्. (पेंट टेक्नॉलॉजी) हा पदव्युत्तर अभ्यासक्रमदेखील उपलब्ध आहे.
- डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे टेक्निकल इन्स्टिट्यूट, डेक्कन जिमखाना, पुणे
- या संस्थेमध्ये डिप्लोमा इन सर्फेस कोटिंग टेक्नॉलॉजी हा १२वी विज्ञान शाखेनंतरचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
- गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अॅण्ड डेव्हलपमेंट, विद्यानगरी, कलिना कॅम्पस, सांताक्रूझ (पू.)
-. आनंद मापुस्कर
- या संस्थेमध्ये १२वी विज्ञान शाखेनंतरचा डिप्लोमा इन पेंट अॅप्लिकेशन हा अडीच वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
...............................................................
तुम्ही एखाद्या वेबसाइटवरचा फॉर्म भरत असता. त्यात तुम्ही सर्रास खोटी उत्तरंही भरता. पण तुम्ही दिलेलं उत्तर हे खरं आहे की खोटं ते चक्क तुमच्या हातातला माऊस ओळखू शकला तर?
तुम्ही एखाद्या वेबसाइटवरचा फॉर्म भरत असता. त्यात तुम्ही सर्रास खोटी उत्तरंही भरता. पण तुम्ही दिलेलं उत्तर हे खरं आहे की खोटं ते चक्क तुमच्या हातातला माऊस ओळखू शकला तर? चक्रावलात ना…पण हे खरं आहे. 'आर्टिफिशल इंटेलिजन्स' या तंत्रज्ञानाचा वापर करत, तुम्ही जी माहिती देताय ती खरी आहे की खोटी हे ओळखणं आता शक्य होणार आहे.
आपला दिवसातला बराचसा वेळ हा हल्ली कम्प्युटरवरच जातो. बऱ्याचदा काही वेबसाइट्स, अॅप्सवर आपली वैयक्तिक माहिती विचारली जाते. आपण कित्येकदा खोटी माहिती तिथे भरतो. पण इटलीतल्या संशोधकांच्या एका टीमनं मात्र, माऊसच्या वापरावरून तुम्ही दिलेल्या उत्तराची सत्यता आता तपासली जाऊ शकते, असं म्हटलंय. 'आर्टिफिशल इंटेलिजन्स' या तंत्रज्ञानाचा वापर यासाठी करण्यात आला आहे. प्रश्नांची उत्तरं देताना युजर माऊसचा वापर कसा करतो यावरून तो खरं बोलतोय की खोटं हे कम्प्युटर ओळखू शकतो.
ऑनलाइन रिव्ह्यूज, इन्शुरन्सचे क्लेम्स एवढंच नव्हे तर गुन्हेगारांच्या उत्तरांमधील खरे-खोटेपणा सिद्ध करण्याची क्षमता या शोधात आहे असंही संशोधकांची ही टीम सांगतेय. जन्मतारीख, घरचा पत्ता अशी काहीही माहिती उपलब्ध नसताना युजरची माऊसद्वारे काही विशिष्ट प्रश्नांची उत्तरं देण्याची केवळ रीत पारखून उत्तरांची सत्यता तपासता येणार आहे.
आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीनं माऊस वापरण्यावरुन माणसाची विचारक्षमता ओळखली जाऊ शकते. खरं उत्तर देताना युजर आपला कर्सर लगेच त्या पर्यायाकडे नेतो. तर चुकीचं किंवा खोटं उत्तर देताना युजर वेगवेगळ्या पर्यायांभोवती कर्सर फिरवतो व जास्त वेळ घेतो. या संशोधनात ६०विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यास सांगितली गेली. त्यांच्या उत्तरं देण्याचा पॅटर्न कम्प्युटरने हेरला व खऱ्या, खोट्या उत्तरांच्या माऊस हालचालींमधील फरक ओळखू लागला.
‘आपला मेंदू नेहमी पहिल्यांदा सत्याकडे वळतो. त्यामुळे आपण जेव्हा खोटं बोलतो तेव्हा मूळ उत्तर लपवतो आणि त्याच्या जागी दुसरं उत्तर देतो.’ असं या संशोधकांची टीम सांगते. एखादा अतिहुशार व्यक्ती याला नक्कीच फसवू शकतो, परंतु काही विचित्र प्रश्नांची उत्तरं देताना मात्र त्याचीही तारांबळ उडू शकते. दिलेल्या उत्तरांमधील सत्यता कीबोर्डद्वारेही पारखण्याचं तंत्र ही टीम आता विकसित करणार आहे.
सर्च रिझल्ट्समध्ये फेरफार केल्याप्रकरणी गुगल या सर्च इंजिनला युरोपियन युनियनने दणका दिला असून गुगलला २.४२ अब्ज युरो म्हणजेच सुमारे १७ हजार ४०० कोटी रुपयांचा जबर दंड ठोठावण्यात आला आहे. युरोपियन युनियनच्या एका नियामक आयोगाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, गुगलविरोधात आणखी दोन प्रकरणं प्रलंबित असून त्या प्रकरणांतही गुगलविरोधात निर्णय जाण्याची दाट शक्यता आता वर्तविली जात आहे.
अल्फाबेट ही गुगलची पॅरेंट कंपनी असून युरोपियन युनियनकडून झालेली दंडात्मक कारवाई हा कंपनीसाठी मोठा हादरा आहे. मुख्य म्हणजे पुढच्या ९० दिवसांत गुगलने आपल्या शॉपिंग सर्विससाठी दिला जात असलेला फेवर बंद केला नाही तर अल्फाबेट कंपनीच्या रोजच्या जागतिक उत्पन्नातून ५ टक्के वेगळा दंड वसूल केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
आयोगाने केलेल्या चौकशीत गुगलची चोरी पकडली गेली आहे. गुगलने आपल्या सिस्टीममध्ये तांत्रिक फेरफार केल्याने सर्च रिझल्टमध्ये गुगलच्या शॉपिंग सेवाच प्रामुख्याने दिसतात, असे उघड झाले आहे. गुगलची कृती नियमांचा भंग करणारी आहे. त्यामुळे अन्य कंपन्या तसेच ग्राहकांचीही दिशाभूल झाली आहे, असे स्पर्धा नियामक आयोगाच्या अध्यक्षा मार्गरेथ वेस्टागेयर यांनी नमूद केले.
दरम्यान, सात वर्षांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. येल्प, ट्रिपअॅडव्हायझर, फाउंडेम, न्यूज कॉर्प आणि फेअरसर्च या कंपन्यांनी गुगलकडून सर्च रिझल्ट्समध्ये फेरफार केला जात असल्याची तक्रार केली होती.
माऊस शोधणार खरं-खोटं
तुम्ही एखाद्या वेबसाइटवरचा फॉर्म भरत असता. त्यात तुम्ही सर्रास खोटी उत्तरंही भरता. पण तुम्ही दिलेलं उत्तर हे खरं आहे की खोटं ते चक्क तुमच्या हातातला माऊस ओळखू शकला तर? चक्रावलात ना…पण हे खरं आहे. 'आर्टिफिशल इंटेलिजन्स' या तंत्रज्ञानाचा वापर करत, तुम्ही जी माहिती देताय ती खरी आहे की खोटी हे ओळखणं आता शक्य होणार आहे.आपला दिवसातला बराचसा वेळ हा हल्ली कम्प्युटरवरच जातो. बऱ्याचदा काही वेबसाइट्स, अॅप्सवर आपली वैयक्तिक माहिती विचारली जाते. आपण कित्येकदा खोटी माहिती तिथे भरतो. पण इटलीतल्या संशोधकांच्या एका टीमनं मात्र, माऊसच्या वापरावरून तुम्ही दिलेल्या उत्तराची सत्यता आता तपासली जाऊ शकते, असं म्हटलंय. 'आर्टिफिशल इंटेलिजन्स' या तंत्रज्ञानाचा वापर यासाठी करण्यात आला आहे. प्रश्नांची उत्तरं देताना युजर माऊसचा वापर कसा करतो यावरून तो खरं बोलतोय की खोटं हे कम्प्युटर ओळखू शकतो.
ऑनलाइन रिव्ह्यूज, इन्शुरन्सचे क्लेम्स एवढंच नव्हे तर गुन्हेगारांच्या उत्तरांमधील खरे-खोटेपणा सिद्ध करण्याची क्षमता या शोधात आहे असंही संशोधकांची ही टीम सांगतेय. जन्मतारीख, घरचा पत्ता अशी काहीही माहिती उपलब्ध नसताना युजरची माऊसद्वारे काही विशिष्ट प्रश्नांची उत्तरं देण्याची केवळ रीत पारखून उत्तरांची सत्यता तपासता येणार आहे.
आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीनं माऊस वापरण्यावरुन माणसाची विचारक्षमता ओळखली जाऊ शकते. खरं उत्तर देताना युजर आपला कर्सर लगेच त्या पर्यायाकडे नेतो. तर चुकीचं किंवा खोटं उत्तर देताना युजर वेगवेगळ्या पर्यायांभोवती कर्सर फिरवतो व जास्त वेळ घेतो. या संशोधनात ६०विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यास सांगितली गेली. त्यांच्या उत्तरं देण्याचा पॅटर्न कम्प्युटरने हेरला व खऱ्या, खोट्या उत्तरांच्या माऊस हालचालींमधील फरक ओळखू लागला.
‘आपला मेंदू नेहमी पहिल्यांदा सत्याकडे वळतो. त्यामुळे आपण जेव्हा खोटं बोलतो तेव्हा मूळ उत्तर लपवतो आणि त्याच्या जागी दुसरं उत्तर देतो.’ असं या संशोधकांची टीम सांगते. एखादा अतिहुशार व्यक्ती याला नक्कीच फसवू शकतो, परंतु काही विचित्र प्रश्नांची उत्तरं देताना मात्र त्याचीही तारांबळ उडू शकते. दिलेल्या उत्तरांमधील सत्यता कीबोर्डद्वारेही पारखण्याचं तंत्र ही टीम आता विकसित करणार आहे.
...............................................................
गुगलला १७ हजार कोटींचा दंड!
सर्च रिझल्ट्समध्ये फेरफार केल्याप्रकरणी गुगल या सर्च इंजिनला युरोपियन युनियनने दणका दिला असून गुगलला २.४२ अब्ज युरो म्हणजेच सुमारे १७ हजार ४०० कोटी रुपयांचा जबर दंड ठोठावण्यात आला आहे. युरोपियन युनियनच्या एका नियामक आयोगाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, गुगलविरोधात आणखी दोन प्रकरणं प्रलंबित असून त्या प्रकरणांतही गुगलविरोधात निर्णय जाण्याची दाट शक्यता आता वर्तविली जात आहे.
अल्फाबेट ही गुगलची पॅरेंट कंपनी असून युरोपियन युनियनकडून झालेली दंडात्मक कारवाई हा कंपनीसाठी मोठा हादरा आहे. मुख्य म्हणजे पुढच्या ९० दिवसांत गुगलने आपल्या शॉपिंग सर्विससाठी दिला जात असलेला फेवर बंद केला नाही तर अल्फाबेट कंपनीच्या रोजच्या जागतिक उत्पन्नातून ५ टक्के वेगळा दंड वसूल केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
आयोगाने केलेल्या चौकशीत गुगलची चोरी पकडली गेली आहे. गुगलने आपल्या सिस्टीममध्ये तांत्रिक फेरफार केल्याने सर्च रिझल्टमध्ये गुगलच्या शॉपिंग सेवाच प्रामुख्याने दिसतात, असे उघड झाले आहे. गुगलची कृती नियमांचा भंग करणारी आहे. त्यामुळे अन्य कंपन्या तसेच ग्राहकांचीही दिशाभूल झाली आहे, असे स्पर्धा नियामक आयोगाच्या अध्यक्षा मार्गरेथ वेस्टागेयर यांनी नमूद केले.
दरम्यान, सात वर्षांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. येल्प, ट्रिपअॅडव्हायझर, फाउंडेम, न्यूज कॉर्प आणि फेअरसर्च या कंपन्यांनी गुगलकडून सर्च रिझल्ट्समध्ये फेरफार केला जात असल्याची तक्रार केली होती.
...............................................................
सोशल मीडियावर जातिवाचक शब्द वापरणाऱ्यांविरोधात ‘अॅट्रॉसिटी’!
सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत जात आहे. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा जातिवाचक शब्दांचाही वापर होताना दिसतो. दिल्ली हायकोर्टाने यासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सोशल मीडियावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना उद्देशून कोणताही जातिवाचक शब्द वापरल्यास तो शिक्षेस पात्र गुन्हा ठरेल.
एका महत्त्वाच्या खटल्यात सुनावणीदरम्यान दिल्ली हायकोर्टाने स्पष्ट केलं की, सोशल मीडियावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील कुणाही व्यक्तीबद्दल जातिवाचक शब्द वापरल्यास दोषींवर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई केली जाईल.
दिल्ली हायकोर्टाने फेसबुकशी संबंधित खटल्यात हे स्पष्ट केले असले, तरी व्हॉट्सअॅप, ट्विटरसारख्या सर्वच सोशल मीडियाना हे लागू असेल.
दिल्ली हायकोर्टाने यासंबंधी फेसबुकचं उदाहरण दिलं. न्यायमूर्ती विपीन संघी म्हणाले, “फेसबुकवर जेव्हा कुणी प्रायव्हसी सेटिंग ‘प्रायव्हेट’ न ठेवता, ‘पब्लिक’ करतो, त्यावेळी त्याच्या वॉलवर कुणीही लिहू शकतो. अगदी त्याच्या फ्रेण्ड लिस्टमध्ये नसलेले मित्रही. मात्र,सेटिंग ‘प्रायव्हेट’ केल्यानंतरी स्वत:च्या वॉलवर जातिवाचक शब्द वापरल्यासही शिक्षेस पात्र असेल.”
“दिल्ली हायकोर्टाने अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे. कारण सोशल मीडियावर अनेकजण कोणतेही तारतम्य न बाळगता व्यक्त होत असतात. सोशल मीडियावर कुणाचाही अपमान होणार नाही, अनादर होणार नाही, असं बोलणं आवश्यक आहे.”
३० टक्के जणांना येतो ‘सायलंट हार्ट अटॅक’
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे, पण महिला आणि प्रौढ व्यक्तींमध्ये ३० टक्के जणांना हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचे खूप उशिरा समजते. कारण हृदयविकाराचा झटका आल्यावर छातीत दुखण्यापेक्षा अन्य लक्षणे त्यांच्यात दिसून येत असून, या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते.
जबड्यापासून ते पोटापर्यंतच्या अवयवांमध्ये अति दुखणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. याविषयी जनजागृती नसल्यामुळे अनेकदा ही दुखणी अंगावर काढली जातात. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आल्याचे समजत नाही. उशिरा निदान झाल्यामुळे नुकसान जास्त प्रमाणात होऊन जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे इंटव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अनिल शर्मा यांनी सांगितले.
अनेकदा हृदयविकाराचा झटका आल्यावर जबडा दुखणे, खांदे दुखणे,पोटात गॅस झाल्यासारखे वाटून अस्वस्थ वाटणे ही लक्षणेही दिसून येतात. त्यामुळे सर्वांनीच विशेष काळजी घेतली पाहिजे. उच्चरक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्राल नियंत्रणात नसल्यास, हृदयविकाराचा धोका बळावतो. त्याचबरोबरीने मद्यपान आणि धूम्रपानामुळेही हृदयविकार जडण्याचे वय कमी झाल्याचे दिसून येते.
हृदयविकाराला आळा घालण्यासाठी जीवनशैली सुधारण्याची आवश्यकता आहे. रोज व्यायाम, संतुलित आणि सकस आहार घेतल्यास हृदयविकाराला सहज लांब ठेवता येते. २५ वर्षांनंतर दर पाच वर्षांनी आणि ४० वर्षांनंतर प्रत्येक वर्षी सामान्य शारीरिक तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे ही डॉ. अनिल यांनी स्पष्ट केले.
हृदयविकार दिन का?
फ्रॅमिंगहॅम हार्टस्टडीमधील सर्व प्रथम वैद्यकीय चिकित्सा २९ सप्टेंबर १९४८ साली सुरू झाली. त्या रोग परिस्थिती विज्ञान (इपिडीमिलॉजीकल) अभ्यासामुळे हृदयविकारावर निष्णात उपचार निर्माण झाले. म्हणूनच २९ सप्टेंबरला ‘हृदयविकार दिन’ म्हणून पाळला जातो.
एक सिगारेट करते ११ मिनिटांनी आयुष्य कमी
तरुणांच्या हातात अगदी सहजनेते‘स्टाईल’ म्हणून दिसणारी सिगारेट ही त्यांच्या आयुष्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. एक सिगारेट ओढल्याने आयुष्यातील ११ मिनिटे कमी होतात.
हृदयविकाराची कारणे
अनुवांशिक जीवनशैली, तंबाखू खाण्याची सवय, मद्यप्राशन, धूम्रपान, सतत बसून काम करणे, स्थूलता , मानसिक ताणतणाव, चुकीची आहार पद्धती
कसा टाळू शकता?
स्थूलता कमी करा, तळलेले पदार्थ खाणे टाळा, तंबाखू खाणे सोडा, धूम्रपान करू नका, व्यायाम करा, चाला, मीठ कमी खा,रक्तदाबावर नियंत्रण ठेवा, मधुमेह वाढू देऊ नका, जास्त मानसिक ताण घेऊ नका, रक्तातील चरबीची तपासणी करून घ्या, रक्ताच्या नातेवाईकांना हृदयविकार असल्यास काळजी घ्या.
..........................................................................
रात्रीच्या नाष्ट्यामुळे वजन वाढण्याची शक्यता
दिवसभर थोडे थोडे खाण्यापेक्षा रात्रीचा नाष्टा वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो, असे आढळून आले आहे. रात्रीच्या जेवणामुळे शरीरात मेदाचे प्रमाण वाढते, मात्र दिवसाच्या जेवणाचा उपयोग शरीरात इंधन म्हणून होतो.शास्त्रांनी केलेल्या संशोधनात उंदरामध्ये शरीरातील साखर नियंत्रित करण्याची क्षमता असते, असे उघड झाले आहे. दैनंदिन चक्रात झोपेच्या व उठण्याच्या वेळेत बदल केल्यानंतर शरीरात अधिक मेद जमा होण्यास सुरुवात होते, असे लाईव्हसान्सचा अहवालात म्हटले आहे. रात्रपाळीत काम करणार्या कर्मचार्यांना मधुमेह व लठ्ठपणाची समस्या का भेडसेवते, याची उकल या संशोधनात करण्यात आली आहे. तुमच्या जैविक घड्याळातील वेळा बिघडल्यानंतर शररीरात मेद जमा होण्याची प्रक्रिया वाढते. असे व्हॅडर्राबेल्ट युनिव्हर्सिटीतील क्रोनोबायोलॉजिस्ट व संशोधन अहवालाचे कार्ल जॉन्सन यांचे म्हणणे आहे. तुम्ही काय खाता, यापेक्षा केव्हा खाता, हे महत्त्वाचे आहे.
...................................................
घरगुती उपाय
आपल्या स्वयंपाकातील विविध घटकांचा वापर नेहमी उदभवणाऱ्या आजारांवर प्रभावीपणे करता येतो. हे समजल्यावर आपण चकित व्हाल. प्राचिन काळापासुन विविध भारतीय मसाले व त्यातील घटकांचा वापर वेगवेगळ्या आजारावर होतो. तसाच आपल्या जेवणात वेगळा स्वादही निर्माण केला आहे. छोट्या मोठ्या आजारांसाठी आपल्या डॉक्टरकडे जाणे किंवा औंषधांच्या दुकानात सहज उपलब्ध होणाऱ्या गोळ्या खाणे. यापेक्षा निर्सगात सहज उपल्ब्ध असणारया घटकांचा वापर आपल्यासाठी व कुटुंबासाठी करणे हे अधिक चांगले.
एका बाजुला ऍलोपॅथिक औषधांच्या दुष्परीणामाबद्दल समाजात जागृती होत आहे. कारण निसर्गाकडे चला, ही चळवळ जोर धरत आहे. कारण पदार्थाचा वापर करुन आरोग्याची काळजी घेणे ही फार सोपी गोष्ट आहे अगदी अशिक्षीत गृहिणी सुध्दा याचा वापर करुन शकते. शिवाय ते सहज उपलब्धही आहेत.
.....................................................................................
डेंग्यु
डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू विषाणूंमुळे होतो. इडिस इजिप्ती डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. ह्या रोगावे दोन प्रकार आहेत. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ). डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.
भारतात १९६३ साली कलकत्त्यात डेंगीची याची पहिली मोठी साथ आली. त्यानंतर बहुतांश महानगरे, शहरे व ग्रामीण भागांमधेही डेंग्यूचा उद्रेक झाल्याची वृत्ते येऊ लागली.
लक्षणे
१) डेंग्यू ताप
लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप. सोबत डोके-डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणत
एकदम जोराचा ताप चढणेडोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणेडोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होतेचव आणि भूक नष्ट होणेछाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणेमळमळणे आणि उलट्यात्वचेवर व्रण उठणे
२) डेंग्यू रक्तस्स्रावात्मक ताप (डीएचएफ)
हा गंभीर स्वरूपाचा प्रकार असून यात तापाबरोबरच बाह्य रक्तस्राव - चट्टे उठणे, हिरड्यांमधून रक्तस्राव, अंतर्गत रक्तस्राव-आंतड्यांमधून रक्तस्राव, प्लेटलेट्सची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. तसेच छातीत, पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. बाकी लक्षणे डेंग्यू तापाप्रमाणेच असतात.
तीव्र, सतत पोटदुखीत्वचा फिकट, थंड किंवा चिकट होणेनाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे आणि त्वचेवर पुरळ उठणेरक्तासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होणेझोप येणे आणि अस्वस्थतारुग्णाला तहान लागते आणि तोंड कोरडे पडतेनाडी कमकुवतपणे जलद चालतेश्वास घेताना त्रास होणे
३) डेंग्यू अतिगंभीर आजार
ही डेंग्यू रक्तस्राराच्या तापाचीच पुढची अवस्था असून काही टक्के लोकांमध्येच ही दिसून येते. यात रुग्णाचे अस्वस्थ होणे, थंड पडणे, नाडी मंदावणे, रक्तदाब कमी होणे आणि शेवटी मृत्यू ओढावू शकतो.
प्रसार
आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यू विषाणू ‘इडिस इजिप्ती’ जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसर्या निरोगी व्यक्तीस संक्रमित केले जातात. हे डास साधारणपणे समुद्रसपाटीपासून १००० मीटर पर्यंतच्या भागात जिवंत राहतात. याच्या साथी वेगाने पसरू शकतात. इडिस इजिप्ती हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे ५ मिलीमीटर असतो. हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला ७ ते ८ दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो.साधारणपणे हे डास दिवसा सकाळी अथवा संध्याकाळी चावतात.
औषधोपचार
ताप असेपर्यंत आराम करावा. ताप आल्यानंतर खूप वाट पाहू नये (४-५ दिवसांपेक्षा जास्त). त्यानंतर किंवा त्यापूर्वी पेशंटला डॉक्टरांकडे घेउन जावे. निर्जलीकरण होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर उपयोग करावा. (उदा. क्षार संजीवनी) रक्तस्राव किंवा शॉकची लक्षणे असल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे.
प्रतिबंध
डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय रोगाला प्रसरण्यापासून थांबू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साठून देणे, वेळ्च्यावेळी साठलेले पाणी रिकामे करणे या गोष्टी डासांना प्रतिबंध करू शकतात. संपूर्ण अंगभर कपडे घातल्याने डासांपासून आपले संरक्षण होऊ शकते.
या विषाणूवर प्रतिजैविके उपलब्ध नाहीत. तेव्हा गंभीर स्वरूपांच्या आजाराची वेळेत शहानिशा करून रुग्णाला वेळेत हॉस्पिटलमध्ये नेल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात
...............................................................
...............................................................
मुलं जन्माला घालण्यासाठी सेक्सची गरज नाही!
पुढच्या ३० वर्षांमध्ये कदाचित विज्ञान इतकं प्रगत होईल की मुलं जन्माला घालण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्याची गरज भासणार नाही... हे भाकित वर्तवलंय स्टॅन्फर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक हँक ग्रीली यांनी. त्यांच्या म्हणण्यानुसार काही वर्षांनी मात्या-पित्याच्या डीएनएद्वारे भ्रूण प्रयोगशाळेतच तयार होतील. तेही एक नव्हे वेगवेगळे! बाजारात भाजी निवडतो तशी त्यातून एक भ्रूण निवडता येईल!!
प्राध्यापक म्हणतात, 'एक धोका मात्र या प्रक्रियेत आहे, तो म्हणजे पत्नीला भ्रूण क्रमांक १५ हवा आहे आणि पतीला भ्रूण क्रमांक ६४, यावरून पती-पत्नीची भांडणं होऊ शकतील! या भांडणांचं पर्यवसान घटस्फोटातही होऊ शकेल.' प्रा. हँक यांचा हा संपूर्ण संशोधन प्रकल्प अर्काइव्ह्ज ऑफ सेक्शुअल बिहेवियरमध्ये प्रसिद्ध झाल आहे. पती-पत्नींच्या शारीरिक संबंधांचा आलेख आतापासूनच घटता आहे. हँक यांच्या या अभ्यासानुसार, अमेरिकेत १९९० मध्ये विवाहित जोडपी एका वर्षांत ७३ वेळा सेक्स करत. २०१४ मध्ये ही संख्या घटून ५५ झाली आहे. याउलट बॅचलर एका वर्षात ५९ वेळा सेक्स करतात!

No comments:
Post a Comment